कुर्डुवाडीत मौलाना अबुल कलाम यांना अभिवादन…..

माढा, ११ नोव्हेंबर २०२०: राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते तथा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने कुर्डूवाडी शहरासह विस्तारित भागात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

प्रारंभी मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस अल्पसंख्यक सेलचे शहराध्यक्ष हामीद शिकलकर, धीरज शिंदे, आदर्श जाधव, कुणाल गायकवाड, साईराज गोरे, करण गवळी यांच्यासह काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा