जम्मू काश्मीर, दि. २३ जून २०२० : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांचे सत्र सुरूच आहे. पुलवामाच्या त्राल सेक्टरमधील बाटगुंडच्या सीआरपीएफ कॅम्पजवळ गोळीबार सुरू असताना ग्रेनेड हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या विस्तृत माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे.
सीआरपीएफ कॅम्प जवळ सुरू असलेल्या गोळीबारात ग्रेनेड चा हल्ला होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये एका अज्ञात बंदूकधारीने रात्रीच्या सुमारास ढोक डिफेंस कमेटी (डीडीसी) चे सदस्य असलेले गोपीनाथ यांना गोळी मारली.
मात्र, पोलिसांचे म्हणणे आहे की, ३५ वर्षीय गोपाळनाथ यांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला गोळी लागली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी ही दहशतवादी घटना नसल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११,३० वाजता झोम्परी डलजवळ ही घटना घडली. हे ठिकाण भादरवाहपासून १६ कि.मी. अंतरावर आहे. गोपालनाथ हे ढोक संरक्षण समितीचे सदस्य आहेत.
अनंतनागमधील एन्काउंटर
दरम्यान, खोऱ्यात आजही दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाची चकमक झाली. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग जंगलात सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमक घडली. दहशतवाद्यांना जंगलात लपवण्याचे इनपुट सुरक्षा दलाला मिळाले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या अहवालानुसार जम्मू-काश्मीर पोलिस, आर्मी पॅरा कमांडो आणि सीआरपीएफ यांच्यासह सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने सोमवारी सकाळी वेरिनागच्या जंगलात शोधमोहीम चालविली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.
काल ४ दहशतवादी ठार
दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमध्ये रविवारी सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. प्रथम सुरक्षा दलांनी शोपियान जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार केले. त्यानंतर श्रीनगरमधील जडीबाल येथे शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी