गृह खात्यावरून घडले खातेवाटप

मुंबई: सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले तरी खातेवाटप अद्याप झालेली नाही. महत्वाचे खाते आपल्याकडे कसे राहतील याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. मुख्यमंत्रीपद जरी आपल्याकडे असले तरी महत्त्वाची खाती इतर पक्षांकडे गेल्यास सत्तेला महत्त्व राहणार नाही हे शिवसेना जाणून आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शिवसेना राजी नसल्याने खाते वाटपाचा निर्णय ठप्प झाला आहे. गृहखाते राष्ट्रवादीला दिले तर राज्याचा अर्धा कारभार त्यांच्याकडे जाईल हे लक्षात घेत शिवसेनेने हे खाते सोपवण्यात बद्दल असमर्थता व्यक्त केली. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशन आधी खातेवाटप निर्णय होणे दुरापास्त झाले आहे. गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसला विनाकारण दिले अशी खंत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण जाहीरपणे बोलून दाखवतात. मुंडे यांनी १९९५ सली शिवसेनेला गृहखाते दिले नव्हते. शिवसेना या विषयावर काहीही बोलणे टाळले आहे. तरी हे खाते कसे सोडणार असा प्रश्न त्यांनी केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा