जीएसटी दर वाढवण्याच्या तयारीत सरकार… या गोष्टी महाग होतील

नवी दिल्ली: वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात वाढ करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील अधिकारी यांच्यात आज दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. जीएसटी दर वाढविणे आणि विद्यमान जीएसटी स्लॅबमधील बदलांसह अनेक सूचनांवर विचार केला जाईल. या बैठकीत जीएसटी दर, जीएसटी स्लॅब आणि भरपाई उपकर या तिन्ही मुद्द्यांवर चर्चा होईल आणि बदल करण्याबाबत शिफारस केली जाईल.
वास्तविक जीएसटी संकलनात सातत्याने घट होत असल्यामुळे या सर्व चर्चा होत आहेत. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात राज्यांकडून सूचना मागवल्या होत्या. सूचनांनुसार दर वाढवण्याचे धोरण ठरविले जाईल. या सूचनेत असे म्हटले होते की ज्यांना सूट प्रवर्गातील वस्तू म्हणजेच जीएसटी सध्या अस्तित्त्वात नाही त्यांनादेखील स्लॅबच्या खाली आणले जाईल. या व्यतिरिक्त बरेच दर बदलले जाऊ शकतात. रॉ सिल्क, लक्झरी हेल्थकेअर, हाय व्हॅल्यू होम लीजिंग, ब्रँडेड सिरियल, पिझ्झा, रेस्टॉरंट्स, क्रूझ शिपिंग, प्रिंट एडव्हर्टायझिंग, एसी ट्रेन तिकिटे, ऑलिव्ह ऑईल अशा डझनभर वस्तूंच्या दर बदलाविषयी चर्चा केली जात आहे. म्हणजेच त्यांचे दर वाढवून जीएसटी महसूल वाढविण्यावर विचार केला जात आहे.
याशिवाय जीएसटी स्लॅबमध्येही बदल करण्याची चर्चा आहे. राज्यांनी सर्वात कमी स्लॅब म्हणजेच ५ टक्के स्लॅब ६ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा