जीएसटी निरीक्षक व खाजगी कर सल्लागार लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर : शहरातील जीएसटी कार्यालयातील लाचखोर अधिकारी व त्याचा सहकारी यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाने केली.
राज्य कर निरीक्षक विशाल सुखदेव भोर (रा. भूषणनगर, केडगाव) आणि खाजगी कर सल्लागार निलेश म्हातारबा बांगर (रा. रानमळा बेल्हे, ता. जुन्नर, पुणे), असे लाचखोरांची नावे आहेत.
पारनेर तालुक्यातील निघोज (शिरसुले) येथील दिगंबर घोगरे यांनी काही दिवसांपूर्वी कृषी सेवा केंद्र चालू केले होते. त्यावेळी त्यांनी सरकारला कर भरण्यासाठी जीएसटी नंबर काढला होता. परंतु त्यांनी पुढे ते दुकान बंद केले.
मात्र जीएसटी नंबर बंद केला नाही. त्यामुळे त्यांना जीएसटी कार्यालयातून फोन आला कि, तुम्हाला २ लाख रूपये दंड पडला आहे, तो भरा. नंबर बंद करायचा असेल तर मागील दंड भरावाच लागेल तरी, तुम्ही ऑफिसला या मग काहीतरी मार्ग काढू असेही सुचवले.
पुढे घोगरे यांनी लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने या दोघांना लाच स्वीकारताना पकडले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा