लखनऊमध्ये व्यापाऱ्याच्या घरावर जीएसटी टीमचा छापा, 300 किलो चांदी जप्त

लखनऊ, 27 सप्टेंबर 2021: उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये जीएसटी टीमने शनिवारी चांदी व्यापारी अमित ट्रेडर्सच्या ठिकाणांवर छापा टाकला. छाप्यादरम्यान एकूण 15 क्विंटल चांदी सापडली. त्यापैकी 3 क्विंटल चांदी कागदपत्रांअभावी जप्त करण्यात आली.

याशिवाय चांदी व्यापाऱ्याला समन्स बजावण्यात आलं असून 10 लाख रुपये जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या चांदीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक जीएसटी टीमला 15 क्विंटल चांदी अमित ट्रेडर्स या लखनौच्या चौकात असलेल्या चांदीच्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी सापडली, मात्र, चांदीशी कागदपत्रं जुळवताना 3 क्विंटल चांदीची कागदपत्रौ सापडली नाही. यामुळं अधिकाऱ्यांनी चांदी जप्त केली. तसेच दीड लाख रुपये दंड करण्यात आला.

बराच काळ माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं सहआयुक्त अखिलेश सिंह यांनी सांगितलं. तपासादरम्यान, व्यावसायिकाकडून कागदपत्रं मागण्यात आली, परंतु केवळ एका पानाच्या स्टॉक एवढीच माहिती देण्यात आली. मात्र चांदी तब्बल 15 क्विंटल दगडी होती. जेव्हा कागदपत्रांची जुळवणी करण्यात आली तेव्हा तीन क्विंटल चांदी अतिरिक्त आढळून आली. या अतिरिक्त चांदीचं मूल्य दीड कोटी सांगण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा