रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी केली विविध विकास कामांची पाहणी केली

रत्नागिरी २२ जानेवारी २०२४ : रत्नागिरी एमआयडीसी मधील जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, जिजामाता उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी, र्थ्रीडी मॅपींग मल्टीमीडिया, शिर्के उद्यान येथील श्री विठ्ठल मूर्ती उभारणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टिळक स्मारक सुशोभिकरण, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र या सुरु असलेल्या कामांची पहाणी पालकमंत्री श्री. सामंत यांनी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पालकमंत्री श्री.सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या निधीचे काम मार्गी लावण्याबाबत सूचना केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांना याबाबत पाठपुरावा करण्यास सांगितले.

श्री. सामंत यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. ते म्हणाले, २६ जानेवारी रोजी स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा होणार असून, त्याबाबत तयारी करावी. लोकार्पण दिवशी तसेच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी ‘सागरा प्राण तळमळला’ हे मधूसुदन कालेलकर लिखित नाटक आयोजित करण्यात आले असून, त्याबाबत तयारी करावी. शिर्के उद्यान येथे मुलांच्या खेळण्यांबाबत तसेच प्रकाश यंत्रणेबाबत त्यांनी विशेष सूचना केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा