मुंबई,२३ सप्टेंबर २०२२ : गेल्या अनेक दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा आणि अली फजल त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या काही वर्षापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांची लग्न पत्रिका सध्या सोशल मीडियावर खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिचा चड्डा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा मागील तीन-चार वर्षापासून सुरू आहेत. ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, असं सारखं म्हटलं जात होतं. परंतु प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे गेली, अश्या बातम्या येत होत्या. पण आता लवकरच ते दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे इकोफ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. रिचा व आली याचं निसर्गप्रेम पाहता त्यानें अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार केला आहे.
अली आणि रिचा ने त्यांच्या खास मित्राकडून खास कार्ड डिझाईन करून घेतले आहे. मॅच बॉक्सवर, एक जोडपे रेट्रो लुकमध्ये दिसत आहे. ज्यांचे चेहरे पॉप आर्टच्या मदतीने डिझाईन केले आहे, तर या कार्डवर रिचा आणि अली सायकलवर बसून एकमेकांकडे पाहत आहेत.
आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रिचा आणि अली येत्या ४ ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. हे लग्न दिल्लीच्या जिमखाना क्लब मध्ये होणार असून त्यानंतर दिल्लीतच मोठ रिसेप्शन आयोजित करण्यात आला आहे. नंतर ही जोडी मुंबईतील मित्रपरिवारासाठी मुंबईतही रिसेप्शन आयोजित करणार असल्याचं कळतंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव