आगामी नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून जारी

मुंबई, ३० सप्टेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रौत्सव आणि दसरा सण साधेपणानं साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केल्या. त्यानुसार, देवीच्या मूर्तींची उंची, सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपर्यंत तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांपर्यंत निश्चित केली आहे.

गरबा , दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य द्यावं, अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत. त्याचप्रमाणे देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत, असं आवाहन या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून राज्य सरकारनं केलं आहे.

विसर्जनाच्या तारखेला जर घरगुती आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव परिसर जर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर देवीच्या मूर्तीचं विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे.

नवरात्र उत्सवात ”माझं कुटुंब माझी माझी जबाबदारी” या कोरोना प्रतिबंधासाठीच्या मोहिमेसंदर्भात जनजागृती करावी, देवी दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, देवीच्या मंडपात निर्जंतुकरणाची आणि थर्मल तपासणीची व्यवस्था असावी, मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी अशा सूचना दिल्या असून कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा