अहमदाबाद, ७ जुलै २०२३: मोदी आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाकडुन दिलासा मिळालेला नाही. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी, गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. हा राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.
मोदी आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या राहुल गांधींच्या अर्जावर, आज गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी निकाल दिलाय.
मोदी आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात, सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँगेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी हा जबर धक्का होता. अपात्र ठरण्यापुर्वी राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघांचे खासदार होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर