गुजराती चित्रपट ‘Last Film Show’ ऑस्कर २०२३ मध्ये दाखल, ९ वर्षांच्या मुलाची अनोखी कहाणी

पुणे, २१ सप्टेंबर २०२२: दिग्दर्शक पॅन नलिन यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट Chhello Show (Last Film Show, इंग्रजीत चित्रपटाचं नाव) ऑस्कर २०२३ मध्ये दाखल झालाय. ऑस्करच्या शर्यतीत उतरलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरलाय. हा गुजराती चित्रपट आहे. अकादमी अवॉर्ड्समध्ये आलेला हा देशातील पहिला चित्रपट ठरलाय. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या श्रेणीत त्याचा समावेश करण्यात आलाय.

Last Film Show’ ऑस्कर २०२३ मध्ये दाखल

पॅन नलिनच्या या गुजराती आणि इंग्रजी चित्रपटाने एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला धक्का दिलाय. ऑस्कर २०२३ मध्ये चित्रपटाचा समावेश केल्याबद्दल पॅन नलिनने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच, चित्रपट ऑस्कर २०२३ पर्यंत पोहोचला, याबद्दल आनंद व्यक्त केला. पॅन नलिनने लिहिलं की OMG! आजची रात्र माझ्यासाठी किती छान असणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे आभार. FFI ज्युरी सदस्यांचेही मनःपूर्वक आभार. Chhello Show वर विश्वास टाकणाऱ्या तुम्हा सर्वांचे आभार. आता मी पुन्हा मोकळा श्वास घेऊ शकतो. मी त्या सिनेमावर विश्वास ठेवू शकतो ज्यामुळं मनोरंजन, प्रेरणा मिळते.

Chhello Show हा एक ऑटोबायोग्राफिकल ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये नऊ वर्षांच्या मुलाचं जीवन चित्रित केलंय. या मुलाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं जेव्हा तो थिएटरमध्ये त्याच्या आयुष्याचा पहिला फोटो पाहतो. पॅन नलिन हे त्यांच्या भव्य आणि उत्कृष्ट कामासाठी ओळखले जातात. नलिनने इंडस्ट्रीला ‘संसारा’, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ सारखे उत्तम चित्रपट दिले आहेत.

ही बातमी कळताच ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना विवेकने लिहिलं की, ‘लास्ट फिल्म शो’च्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. ऑस्कर २०२३ मध्ये दाखल झालेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरलाय. मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि आशा करतो की या चित्रपटाला ऑस्कर २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा