गुजरात मधील कोविड -१९ ची स्थिती खरंच नियंत्रणात आहे का?

पुणे, दि. २९ मे २०२०: पहिल्या दृष्टीक्षेपात असे दिसते की गुजरातमधील कोविड -१९ साथीचा रोग काही अंशी नियंत्रणात आहे. कोरोना विषाणूच्या बाबतीत तामिळनाडूने गुजरातला मागे टाकले आहे. गुजरातमधील नवीन प्रकरणे धीम्या गतीने वाढत आहेत आणि हे राज्य दररोज आपल्या लोकांची चाचणी घेत आहे. परंतु बातम्यांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या आकड्यांच्या मागे गुजरात साठी एक चिंताजनक गोष्ट देखील आहे.

२७ मे पर्यंत गुजरातमध्ये ९१५ मृत्यू नोंदले गेले. महाराष्ट्रानंतर देशातील कोणत्याही राज्यात मृत्यूची ही संख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत लोकसंख्येच्या प्रमाणात गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे, परंतु पॉझिटिव प्रकरणांच्या प्रमाणात मृत्युचे प्रमाण खूपच जास्त आहे. गुजरातमध्ये अशा घटनांमध्ये मृत्यू झाल्याचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक आहे. या बाबतीत गुजरातपेक्षा फक्त पश्चिम बंगाल पुढे आहे जिथे हा वाटा ७ टक्के आहे.

सध्या महाराष्ट्रात गुजरातपेक्षा तीन पट पॉझिटिव प्रकरणे आढळून आली आहेत. २७ मे पर्यंत गुजरातमध्ये १४,८२१ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या स्थिती बघता असे वाटत आहे की गुजरातमधील परिस्थिती सुधारत आहे कारण येथे संथगतीने नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात मध्ये पॉझिटिव्ह प्रकरणे सापडण्याचे प्रमाण कमी आहे.

गेल्या सात दिवसांत गुजरातमधील प्रकरणे सरासरी २४ दिवसांत दुप्पट होत आहेत. याचाच अर्थ गुजरातच्या सध्याच्या दराने ३०,००० प्रकरणे पोहोचण्यास सुमारे एक महिना लागणार आहे.

वर केलेल्या तुलनेतून आपल्याला असे वाटत असेल की गुजरातमध्ये परिस्थिती सुधारत आहे. परंतु गुजरात मध्ये सर्वात मोठी समस्या दररोज केल्या जाणाऱ्या चाचणीच्या संख्येची आहे. गुजरात राज्य सरकारला असे वाटत आहे की रोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांचा हा तर्क महत्त्वपूर्ण गोष्टींना बाजूला सारत आहे. त्यातली पहिली महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्या तुलनेत दर १००० व्यक्तींमध्ये चाचणी घेण्याचे प्रमाण गुजरात मध्ये कमी आहे. गुजरातचा चाचण्या घेण्याचा दर खूप कमी वेगाने वाढत आहे. २६ मे पर्यंत गुजरात मध्ये कोविड -१९ चाचणी प्रत्येक १००० लोकांसाठी २.८९ होती. महाराष्ट्रासाठी ही आकडेवारी ३.२ आणि तामिळनाडूसाठी ५.७ आहे.

साथीच्या या टप्प्यावरही गुजरात दररोज कमी लोकांची चाचणी करीत आहे. गुजरात देशातील अशा राज्यांपैकी एक आहे जी राज्ये आपली चाचणी करण्याचा वेग दररोज कमी करत आहे. गुजरात मध्ये नवीन प्रकरणे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे याचे कारण गुजरात कमी प्रमाणात कोविड -१९ चाचण्या घेत आहेत. यामुळे गुजरात ने स्वतःवर टीका करून घेण्याची वेळ आणली आहे.

गुजरातचा नमुना सकारात्मकतेचा दर जास्त असल्याने हे गुजरातसाठी विशेष चिंतेचे आहे. तमिळनाडूच्या बाबतीत बघितले गेले तर तमिळनाडूमध्ये एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येण्यासाठी २४ चाचण्या केल्या जात आहेत. याचा अर्थ असा होतो की तमिळनाडू नवीन प्रकरणे शोधून काढण्यासाठी चाचण्यांचे व्यापक जाळे बनवत आहे. या गोष्टीची तुलना जर गुजरात सोबत केले तर गुजरात एक नवीन प्रकरण शोधण्यासाठी १७ चाचण्या घेत आहे. संक्रमणाचे प्रमाण जसजसे वाढत आहे तसतशी प्रति प्रकरणासाठी चाचण्या घेण्याची संख्या देखील कमी होत आहे. अशा मध्ये एक प्रश्न उपस्थित राहतो की, गुजरात ने जर पूर्णक्षमतेने आपल्या राज्यामध्ये चाचण्या घेतल्या असत्या तर आज गुजरात मध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रकरणे आढळून आले असते हे समजते. गुजरात कमी चाचण्या घेत असल्यामुळे असे भासत आहे की गुजरातमधील स्थिती सामान्य होत आहे. परंतु वास्तव्य भयान आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा