इंदापूर दि.७ ऑक्टोबर २०२०: भादलवाडी(ता.इंदापूर) येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय ८५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन पुतणे व सुना नातवंडे असा परिवार आहे.
सहकार खात्यामध्ये त्यांनी ३६ वर्ष प्रथम श्रेणी सहकारी अधिकारी म्हणून सेवा केली होती. १९९७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर सहकार खात्यातील अनुभवाचा उपयोग करून दूध संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, पाणी वापर संस्था निर्माण करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्या. २०१० मध्ये शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या विनंतीवरून प्रदेश सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली.
विविध आंदोलनात त्यांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली होती. शेतकऱ्यांचे, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. बळीराजाचे सच्चे अभ्यासू लढवय्ये व्यक्तीमत्व हरपल्यची भावना अनेकांनी व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.