आयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग विविध आजारामंध्ये केला जातो. आवळा हे फळ हिवाळ्यामध्ये येत असले तरी त्यापासून मोरावळा (मुरंबा)तयार करून तो मग वापरण्याची एक पद्धत आहे. जो कोणी याचे नियमित सेवन करेल, त्याची जीवनशक्ती प्रचंड वाढते, तो निरोगी राहू शकतो आवळ्याला फक्त फळ म्हणून न पाहता त्याकडे औषध म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण आवळ्यामध्ये असणारे गुणधर्म तुम्हला अनेक आजारापासून दूर ठेवतात. आवळा..बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. या फळात अनेक गुणधर्म आहेत. छोट्याशा आकाराच्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एबी कॉम्पेक्स, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे अनेक सत्व असतात.
आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर व हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्तीत वृद्धी होते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. आवळा रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. हा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून ओज कांती वाढविणारा आहे. छोट्याशा आकाराच्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एबी कॉम्पेक्स, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे अनेक सत्व असतात. काही डॉक्टरांच्या मते दोन वेगवेगळी सत्वे असलेली फळे खाण्यापेक्षा आवळ्याचे सेवन करणे कधीही फायदेशीर ठरते. आवळ्याचे हे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर आंबट, कडू वाटणारा आवळा तुम्हाला गोड वाटू लागेल. जाणूण घेऊयात गुणकारी आवळ्याचे सेवन केल्याने होणारे फायदे…
मधुमेह: आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्तातली साखरेची पातळी मर्यादेत राहते. आवळ्यातील पॉलीफ़ेनॉल हे नियंत्रण ठेवण्याचे काम करते. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाचे दुष्परिणाम कमी होतात. तुम्हाला मधुमेह असेल तर आवळ्याच्या रसात मध मिसळून खाल्याने फायदा होतो.
हृदयाची समस्या: हृदयाला कॉलेस्टॉरॉल पासून वाचवणारे औषध म्हणजे आवळा! कॉलेस्टॉरॉल दोन प्रकारची असतात, एलडीएल आणि एचडीएल. या पैकी एलडीएल कोरोनरी आर्टरी म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये साचते आणि रक्ताचा पुरवठा कमी होतो. असे झाले की हार्टअटॅक येतो. आवळ्याच्या प्राशनाने हे वाईट कॉलेस्टॉरॉल कमी तयार होते. अवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते.
पचनक्रिया: आम्ल अतिप्रमाणात स्त्रवण्याची सवय जठराला लागली की मग ते आम्ल जठराच्या आतल्या भिंतीला कुरतडते आणि अल्सर तयार होतात. आवळ्याचा आहारात समावेश केला तर ॲसिडिटी कमी होते. सहज अन्नपचन होते. पोटात वात धरत नाही. अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. गॅस,ऍसिडिटी, आबट ढेकर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो. आवळ्याचा वापर तुमच्या रोजच्या जेवणात करायला हवा. आवळ्याचे लोणचे, जूस, चूर्ण यासारख्या पदार्थामुळे तुम्ही आवळ्याचा समावेश तुमच्या जेवणात करू शकता.
वजन कमी करणे: वजन वाढणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. अनेक लोक यासाठी हजारो खर्च करतात. आवळा वजन कमी करण्यास मदत करतो. तुमच्या शरीरातील मेंटबॉलिज्म मजबूत करतो यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
मासिक पाळीत गुणकारी: महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता, रक्ताच्या समस्या या सर्व त्रासावर आवळा गुणकारी ठरतो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात यामुळे फायदा होतो