जयपुर, ११ नोव्हेंबर २०२०: गुर्जर आंदोलनला घेऊन बुधवारी जयपुर मधे चर्चा करण्याची तयारी होत आहे. ज्यासाठी आज कर्नल किरोड़ी बैंसला जयपुरला पोहचू शकतात. मुख्यमंत्री आवास मधे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकी नंतर आंदोलन शांत होण्याची चिन्हं आहेत. पण, कर्नल बैंसला बरोबर गुर्जर समाजाचे अनेक नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या आधी सोमवारी अशोक चांदना हे चर्चेसाठी पोहचले होते पण, तरी देखील गुर्जर समाज आंदोलन करत होतं.
माहीती नुसार, बयाना मधे २२३ आंदोलनकर्त्यांवर कार्यवाही करण्यात आली आल्यामुळे बैंसला गट आणि गुर्जर क्रिडा मंत्री अशोक चांदनावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यांनी चांदनाच्या बाजूनं दिवाळीची भेटवस्तू म्हणून याला करार दिला आहे. हे लोक बैकलॉग व प्रक्रियाधीन भर्तीमधे आरक्षण चा लाभ द्यावा म्हणून ६ सूत्री आपल्या मागण्या घेऊन गेल्या ११ दिवसा पासून पीलूपुरा रेल्वे ट्रैकवर बसून आहेत.
मागण्या नाही मान्य झाल्या तर दिल्ली बरोबर एनसीआर मधे करणार चक्काजाम
मंगळवारी ग्रेटर नोएडा पासून गुर्जर समाजाचे १५ सदस्यीय प्रतिनिधि मंडळ पीलूपुरा रेल्वे ट्रैक वर पोहचले आणि तिथं बसलेल्या आंदोलनकर्त्यांबरोबर संवाद साधत बोलले, नोएडा वरून आलेल्या जतन प्रधान पूर्ण भारताचा गुर्जर हा एक समाज आहे, जर वेळ राहता राजस्थान सरकार ने गुर्जर समाजाच्या मागण्या नाही ऐकल्या तर कर्नल बैंसला हे दिल्ली बरोबर एनसीआर ला चक्का जाम करणार आणि त्याची जबाबदारी राजस्थान सरकारची आसणार.
आरक्षण आंदोलनांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे; विजय बैंसला
आंदोलनाची कमान सांभाळणारे विजय बैंसला यांनी म्हटंले कि सरकार या आंदोलनाला दबण्याचे षड्यंत्र करत आहेत. गेल्या १२ दिवसांपासून इंटरनेट बंद केलं आहे, बरोबरच मीडिया ला देखील आंदोलनाचं कवरेज करण्यापासून थांबवलं जात आहे. पुढं ते म्हणाले बयाना-हिंडौन मार्ग आंदोलनकर्त्यांनी नाही तर सरकारनं बंद केला आहे. भरतपुर आणि करौली जिल्ह्यातील पुलिस प्रशासन लोकांना या रस्त्यावरून जाऊ देत नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव