गुरु पौर्णिमा…..

गुरू ब्र्म्हा, गुरू विष्णू ,गुरूदेवो महेशवरा, गुरू साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरूवे नम:

आज गुरु पौर्णिमेचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. भारतीय अध्यात्मवादामध्ये गुरुला अतुलनीय महत्त्व आहे. सत्य हे आहे की एखाद्या व्यक्तीने कितीही आध्यात्मिक पुस्तके वाचलेली असू देत तो कितीही मोठा नावाजलेला व्यक्ती असो किंवा नाव नसलेला ही व्यक्ती असो पण त्याला या जगाचे ज्ञान गुरू शिवाय मिळणारच नाही. यासाठी तो गुरू कुशल असला पाहिजे आणि दुसरे म्हणजे, गुरु जरी आश्रम चालवत नसेल तरी, पण जर चांगले ज्ञान देत असेल तर तो योग्य गुरू समजावा, तोच आपल्या शिष्यांना मदत करू शकतो.

गुरु चे महत्व

गुरु पौर्णिमा हा भारतातील प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. व्यास पौर्णिमा म्हणून पण ही पुजली जाते. आपल्या भारतात हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरा केला जातो. गुरु पौर्णिमाचा हा उत्सव गुरुला आदर समर्पण करण्याचा सण आहे. असे मानले जाते की या दिवशी गुरूंची उपासना केली तर आपल्यावर गुरुची कृपा होते. या दिवशी बरेच लोक गुरुसाठी उपास देखील करतात.

असे मानले जाते की जेव्हा प्राचीन काळात शिष्याने आपल्या गुरुकडून संपूर्ण शिक्षण घेतले, तेव्हा याच दिवशी त्यांनी आपल्या गुरूला गुरूदक्षिणा देऊन आपल्या गुरुची उपासना केली. आश्रमात, उपासनेची व सेवेची विशेष सेवा केली जात असे आणि त्यानंतर अनेक जण आपल्या गुरूला आपल्या क्षमतेनुसार गुरू दक्षिणा देत असत.

शीख धर्म मध्ये गुरु पूर्णिमेला (गुरु पौर्णिमा) विशेष महत्व आहे, कारण शीख धर्मामध्ये दहा गुरूंना विशेष महत्व आहे .शास्त्रांमध्ये गुरुचा अर्थ असा सांगितला आहे की ” गु ” म्हणजे अंधकार व ” रु ” म्हणजे प्रकाश म्हणजेच गुरु एका व्यक्तिस अज्ञान रुपी अंधकारा पासून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेतो.

म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण देशात वेगवेगळ्या गुरूरूपी व्यक्तिंना गुरु मानून पुजले जाते व त्यांच्या प्रती आपल्या संवेदना समर्पित केल्या जातात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा