नानकाना साहिब हल्ल्याप्रकरणी कॉंग्रेसवर भाजप कडून टीका

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारावरील हिंसाचारात भारतात प्रचंड संताप आहे. या प्रकरणात, भारतात अनेक ठिकाणी निषेध केला गेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने या घटनेबाबत काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेवरून भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला आहे. मीनाक्षी लेखी म्हणाल्या आहेत की, ‘मी आतापर्यंत या प्रकरणात कॉंग्रेसकडून काहीही ऐकले नाही. नवज्योतसिंग सिद्धू कुठे कुठे गायब आहेत तेही मला माहित नाही? पाकिस्तान मध्ये झालेल्या घटने नंतरही आयएसआयच्या प्रमुखांना मिठी मारण्याची इच्छा असेल तर कॉंग्रेसने सिद्धू यांच्याकडे लक्ष घातले पाहिजे.

मीनाक्षी लेखी म्हणाल्या, ‘बाबा नानक यांचे मंदिर असल्याने जगभरातील शीखांसाठी महत्वाचे आहे म्हणून नानकाना साहिबला खूप महत्त्व आहे. बाबा नानक यांचा जन्म येथे झाला. हे शीख धर्माचे एक पवित्र ठिकाण आहे. लेखी यांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार निशाना साधताना म्हटले आहे की, नानकाना साहिबचे नाव बदलून गुलाम-ए-मुस्तफा असे ठेवले जाईल अशीही त्यांनी धमकी दिली. पाकिस्तान २१ व्या शतकात अजूनही त्याच स्थितीत आहे.

लेखी म्हणाल्या, पाकिस्तानात धार्मिक स्थळे आणि अल्पसंख्याकांवर वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अनेक दशकांपासून अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. अल्पसंख्याकांचे धर्मांतरही पाकिस्तानात केले जात आहे. त्या म्हणाल्या की असे हजारो पुरावे आहेत की तरूण मुली तिथे पळवल्या जातात आणि त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले तसेच मुस्लिम मुलांबरोबर लग्न केले जाते. तेथे पोलिस, सरकार आणि इतर संस्था या प्रक्रियेचा एक भाग आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा