द्वारका, गुजरात १६ जून २०२३: गुजरातमधील द्वारका येथील ओखा बंदरात बिपरजॉय चक्रीवादळाच्या दरम्यान कोळशाच्या मोठ्या साठ्याला आग लागली. चक्रीवादळामुळे लाटा बंदराच्या भिंतीवर आदळल्या. बंदराच्या आतील बाजूस कोळशाचा साठा होता. दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे कोळशाचे घर्षण झाल्याने कोळशाने पेट घेतला आणि आग लागली. सोसाट्याच्या वाऱ्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. यामधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता.
अरबी समुद्रात निर्माण झालेले महाकाय चक्रीवादळ बिपरजॉय, गुरुवारी रात्री गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. किनारपट्टीवर १२५ किमी प्रतिताशी वेगाने वारे वाहत होते. याच दरम्यान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडत होता. जोरदार वाऱ्यामुळे कोळशामध्ये घर्षण झाल्याने द्वारकाजवळील ओखा बंदरांवर असलेल्या कोळशाच्या साठ्याने पेट घेतला, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सांगण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर