हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या नियोजित इमारतीस बाळासाहेब ठाकरे नाव

हडपसर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हडपसर विधानसभा शिवसेनेच्या वतीने गांधी चौक येथे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विधानसभा प्रमुख तानाजी लोणकर, मा. नगरसेवक विजय देशमुख, मुकेश वाडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी समन्वयक समीर तुपे, प्रभाकर कदम, जान मोहम्मद,प्रशांत पोमन, योगेश जैन, गौरव गायकवाड, अमित गायकवाड,सोमनाथ गायकवाड, सतीश कसबे, चिक्या फडतरे,राजेश शेलार, प्रवीण रणदिवे, रणजित चव्हाण, अमित कांबळे, सुनंदा देशमुख, संजय सपकाळ, आदी शिवसैनिक आणि सर्व पक्षाचे गणेश वाडकर, भरत फुले, सुभाष आरोळे, भागूजी शिखरे, जयप्रकाश जाधव, मुन्ना कोतवाल, चंद्रकांत टिळेकर आदी प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रास्ताविक उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यांनी केले, शिरीष कोल्हटकर यांनी आभार मानले .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा