पाकिस्तान: पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या स्फोटाच्या माध्यमातून लश्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज मुहम्मद सईदचा मुलगा तल्हा सईदला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु स्फोट होण्यापूर्वीच तल्हा तेथून निघून गेला. यामुळे तो थोडक्यात वाचला. टाउनशिप मार्केटमध्ये झालेल्या या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू आणि ६ जण जखमी झाले.
भारतातील अनेक आतंकवादी हल्ल्यांमध्ये हाफिज मुहम्मद सईदचा याचा सहभाग होता. गेले कित्येक वर्षे भारत सरकार पाकिस्तान कडे हाफिज याची मागणी करत आहे. युनायटेड नेशन मध्ये भारताने हाफिज याला आतंकवादी म्हणून घोषित करण्यास सांगितले होते.