हैदराबाद :दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होतायेत. काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडलीय. २२ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेलाच तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पुन्हा एकदा निर्भया हत्याकांड घडलंय. २२ वर्षांच्या एका डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय. हैराबादच्या सायबराबाद स्टेशन पोलिसांनी चार आरोपींना पकडल्याचा दावा केलाय.
यामध्ये दोन गाड्यांचे ड्रायव्हर आणि एका क्लीनरचा समावेश आहे. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी या आरोपींची नावं आहेत.