बारामती, दि.१४ मे २०२०: बारामती तालुक्यातील कऱ्हाटी परिसरात विजांच्या कडकडासह सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट
झाली. धुवांधार पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासनाकडून पंचनामे करून मदत देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
कऱ्हाटी परिसरात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाबरोबर गारपिटीने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडले आहेत. येथील जाधव वस्तीवरील रंजना पांडुरंग जाधव, सुखदेव किसन लोणकरझ सुखदेव साहेबराव पिसाळ, यांच्या राहत्या घरावरील छत, पत्रे उडून गेल्यामुळे घरातील साठवलेले धान्य जीवनावश्यक वस्तू सर्व भिजून गेल्या आहेत.
हातावर पोट असल्यामुळे त्यांच्यापुढे मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातून केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव