कर्जत शहरात पेट्रोलसाठी अर्धा किलोमीटर रांग

कर्जत, दि.७ मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्याच्या काही भागात अत्यावश्यक सेवांमध्ये सूट दिली आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी देखील ठराविक वेळची मर्यादा दिली आहे. पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत ही वेळ आहे.

त्यामध्ये पेट्रोलचा ही समावेश आहे. शेतकरी वर्गासाठी पेट्रोल डिझेल हे महत्वाचे आहे. शेतकरी शेतातील सर्व कामे आधुनिक यंत्राच्या साहाय्याने करीत असतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा वापर त्यांना करावा लागतो. कर्जत मधील सर्वच पेट्रोल पंपावर आज सकाळपासून गर्दी पाहण्यास मिळाली. दरम्यान जलालपूर येथील सिद्धिविनायक पेट्रोलियम पंपावर अर्धा किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग पाहण्यास मिळाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा