सध्या तरुणाईमध्ये असे प्रकार होताना खूप दिसतात.आणि त्याची कारणेही तशीच असतात. मात्र प्रथम ही माहिती घेणे गरजेचे आहे की हस्तमैथुन करणे किंवा केल्याने कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. परंतु काही लोकांना खूप जास्त हस्तमैथुन केल्यानंतर अपराधी वाटते. याचे कारण त्यांचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक विश्वास या गोष्टी असू शकतात.
हस्तमैथुन करणे ही चुकीचेही नाही आणि याने शरीरास कोणतीही हानी होत नाही. तरीसुद्धा तुम्हाला अनेक वेळा हे ऐकायला मिळत असेल की स्वतःला आनंद देणे हे चुकीचे आणि अपराधीपणाचे आहे.याबाबत आजही समाजामध्ये अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे अनेकजण वेगळ्या वाटेला जाऊन नको ते कृत्य करून बसतात.
काही लोकांमध्ये खूप जास्त हस्तमैथुन करण्याची सवय आढळून येते. किंवा तुम्ही दिवसातून जास्त वेळ हस्तमैथुन करणे किंवा त्याबाबत विचार करणे यात घालवता. या स्थितीला हस्तमैथुनाची सवय असे म्हणता येऊ शकते.
एखादी व्यक्ती हस्तमैथुन करण्यासाठी रोजच्या जीवनातील काम सोडून सोडून देत असेल, कामावर किंवा शाळेत जात नसेल, परिवार आणि मित्रांबरोबर बनवलेले प्लॅन कॅन्सल करत असेल, शाळा किंवा कामाच्या ठिकाणावरील महत्त्वाचे इव्हेंट चुकवत असेल तर त्याला हस्तमैथुनाचे एडिक्शन झाले आहे असे म्हणता येईल.
जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्हाला हस्तमैथुनाचे एडिक्शन आहे तर तुम्ही या गोष्टी करून ते कमी करू शकता. धावण्यासाठी जाणे, काहीतरी लिहिणे, मित्रांसोबत व वेळ घालवणे, फिरायला जाणे, हात पाय धुणे, किंवा लगेचच मूत्रविसर्जन करणे,
आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडत असेल की हस्तमैथुन केल्याने सेक्स्यूअल सेन्सिटिव्हिटी कमी होते का?
तर असे होत नाही. याउलट हस्तमैथुन केल्याने उत्तेजना वाढते. यामुळे सेक्स सेन्सिटिव्हिटी वाढण्याचे लक्षण सुद्धा दिसून आले आहे.
त्यामुळे हस्तमैथुन करणे शरीरासाठी तसे अपायकारक नाही.