हनुमानजी राक्षसांविरोधात लढले; आपण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढूया: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन

नवी दिल्ली, ६ एप्रिल २०२३: जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा मुकाबला करावा लागला होता, तेव्हा ते तितकेच कठोर झाले होते. अशाच प्रकारे जेव्हा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजप तितकीच संकल्पबध्द होते. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, हनुमानजी यांचे जीवन आजदेखील देशाच्या विकास यात्रेत प्रेरणा देते. लक्ष्मणावर जेव्हा संकट आले तेव्हा हनूमानजींनी आख्खा पर्वत उचलून आणला होता. यातून प्रेरणा घेत भाजप सर्वसामान्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नात आहे. हनुमानजीं प्रमाणे भारत जगाला आपल्या शक्तीची जाणीव करून देत आहे.

स्थापना दिनानिमित्त दिल्लीत भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सकाळी पक्ष मुख्यालयात झेंडावंदन केले. यावेळी तरुण चुघ, सुनील बन्सल यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते हजर होते. दिल्ली भाजपकडून एका आठवड्यांसाठी सामाजिक न्याय कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा