मुंबईत लवकरच भारतातील पहिले ॲपल स्टोअर होणार सुरू

मुंबई ६ एप्रिल २०२३ : ॲपल लवकरच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड मॉलमध्ये रिटेल स्टोअर उघडणार आहे. कंपनीचे हे रिटेल स्टोअर भारतातील पहिले रिटेल स्टोअर असेल.ॲपलच्या या पाऊलामुळे कंपनीची उत्पादने वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. ॲपल रिटेल स्टोअरला कंपनीने खास डिझाईनही दिले आहे. अनेक वर्षांच्या अडथळ्यांनंतर आणि भारत सरकारशी वाटाघाटी केल्यानंतर भारतात पहिले ॲपल स्टोअर लाँच करण्यात आले त्यामुळे हे लवकरच ग्राहकांसाठी आपले दरवाजे उघडणार आहे.

ॲपलने बुधवारी मुंबईतील त्यांच्या रिटेल स्टोअरच्या बॅरिकेडचे चित्र प्रसिद्ध केले, पण हे स्टोअर कधी उघडेल हे अद्याप स्पष्ट केले नाही.

ॲपल भारतात आधीपासुन स्मार्टफोन बनवत आहे आणि भारतातील मध्यमवर्गिय लोक ॲपलची उत्पादने खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय स्मार्टफोन वापरकर्ते आणि संगणक वापरकर्ते हे दोघेही ॲपलसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत आणि हे लक्षात घेऊनचं त्यानी भारतात आपले स्टोअर आणले.

हे स्टोअर तुम्हाला आयफोन १४, मॅकबुक, आयपॅड्स, एअरपोड्स, ॲपल वॉच, ॲपल टीव्ही,आणि होमपॉड सह अनेक उत्पादने आणि सेवा देऊ शकेल. ग्राहक ॲपल स्टोअरच्या मजल्यावरील ट्रेड-इन प्रोग्राममध्ये देखिल प्रवेश करू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा