गोल पोस्ट इतर शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा – मा. उद्धव ठाकरे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा – मा. उद्धव ठाकरे…

मुंबई, २७ जुलै, २०२२: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस. यानिमित्ताने शिवसैनिक पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहेत. आपली पक्षावरची निष्ठा आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील प्रेम दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवसैनिक करत आहे. अमरावती आणि कोल्हापूरमध्ये बाईक रॅली काढण्यात आली.

अनेक शिवसैनिकांनी शपथपत्र, दहा हजार प्रतिज्ञापत्रांची भेट देऊन आपली पक्षाप्रतीची निष्ठा दाखवली. तर एकाने आपल्या रक्ताने उद्धव ठाकरे यांचे चित्र साकारुन ते भेट दिलं. तर सगळ्यांनी उद्धव ठाकरे याच्या दीर्घ आयुष्य चिंतले.

कापूस हा दिर्घायुष्याचं प्रतीकं मानलं जात. त्यातल्या एका शेतक-यानं कापसाचा हार उद्धव ठाकरेंना अर्पण केला. तर एका शिवसैनिकांने सतत चार दिवस पायी चालत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

रात्री बारा वाजता मातोश्रींवर केक कापून उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला सुरुवात झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे इन अँक्शन आले आहेत, असं म्हणावं लागेल. महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्यामुळे आता उद्धव ठाकरे जनतेला भेटत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत शिवसेना बाजी मारणार की बाजी हारणार, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेचं भवितव्य यात दडलं आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version