सुई दोरा-दिवसाच्या शुभेच्छा…

पुणे, २५ जुलै, २०२२: माळ्यावरची बॅग काढली, तर त्यात हॉस्टेमधला शिवणाचा डबा दिसला आणि उघडतानाच त्यातली सुई बोटाला टोचली. अचानक सुई- दोरा दिवसाचं निमित्त साधलं आणि म्हंटल सुई दो-याचा इतिहास जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा.

सध्याचं जग हे आधुनिक आणि रेडीमेड जग म्हणून ओळखलं जातं. आपल्या मुलभूत गरजेमधली गरज म्हणजे वस्त्र. हे वस्त्र म्हणजेच कापड शिवण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुई-आणि दोरा. खरं तर सध्या सुई आणि दोरा हे केवळ वाक्यप्रचारात वापरला जातो. याखेरीज त्याचे उपयोग नवीन पिढीला माहित असतील, असं फारसं वाटत नाही.

इतिहासकालिनयुगाच्या आधी मानवाने सुईचा शोध लावला. पण तेव्हा धातूच्या ऐवजी त्याने प्राण्यांच्या शिंगापासून प्राण्याची कातडी शिवण्यासाठी सुई म्हणून शिंगाने शिवणकाम करण्याचा प्रताप केला. प्राण्यांच्या कातडी, गवत शिवून त्यातून वस्त्रांची किंवा घरांच्या छपरांची शिलाई करण्यासाठी सुईसदृश वस्तूची आदिवासी व्यक्तीने निर्मिती केली. त्यानंतर प्राणांच्या हाडांपासून सुईची निर्मिती केली गेली. अशा प्रकारे गरजेनुसार सुईमध्ये बदल होत गेला. त्यानंतर दो-यासाठी नारळाच्या झाडांच्या झावळ्यांचा उपयोग केला गेला. नंतर झांडांच्या सालीपासून दोरा करण्यात आला. दोरखंड किंवा दोर अशा रुपात तो समोर आला.

पन्नास हजार वर्षापूर्वी रशियामध्ये पक्ष्यांचा हाडापासून केलेल्या सुया वापरत असत. डेनिसोवा केव, सायबेरिया या रशियातील ठिकाणी मानवाने पक्ष्यांच्या हाडापासूनच्या सुयांचा वापर सुरु केला. त्यानंतरच्या शतकात तांब्यांच्या सुया बाजारात आणल्या गेल्या. ज्या इजिप्तमध्ये तयार झाल्या. फ्लिंडर पेट्री या इजिप्शियन माणसाने या सुया तयार केल्या होत्या. दहाव्या शतकात धातूची निर्मिती झाल्यानंतर पहिली सूई ही स्टील या धातूने तयार करण्यात आली. चीनने स्टीलची निर्मिती करुन सुईची निर्मिती केली. त्यानंतर अधिकृतरित्या धातूंमध्ये सुया तयार केल्या गेल्या.

१८५०मध्ये जर्मन कंपनी शुमग या कंपनीने शिलाईमशिनमध्ये सुई बसवून आपोआप शिवण्याची पद्धत रुजू केली. त्यानंतर इंग्रजांनी अधिकृतपणे सुईला भारतात आणले. आणि भारतात सर्रास सुयांचा आणि दो-याचा वापर सुरु झाला. अशा पद्धतीने सुई आणि दोरा यांचा आपल्या आयुष्यात उगम झाला.
तेव्हा आजच्या या आंतरराष्ट्रीय सुई दोरा दिवसाच्या निमित्ताने घरी गेल्यावर दोन टाके घाला आणि सुई दोरा दिवसाचा आनंद घ्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा