दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती, श्रेयस अय्यर करणार टीम इंडियात कमबॅक

पुणे, २७ सप्टेंबर २०२२ : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला. आता भारतीय संघाला पुढील आव्हान दक्षिण आफ्रिकाचं असेल. २८ सप्टेंबर पासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी ट्वेंटी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

एका मीडिया रिपोर्टनुसार ‘दक्षिण आफ्रिकेच्या’ विरुद्ध टी ट्वेंटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर खुप टाईमानंतर संघात पुनरागमन करत आहे. तसेच हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा च्या जागी डावखुरा फिरकीपट्टू शहाबाद अहमद याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

तसेच मोहम्मद शमी कोरोनातून अजून सावरलेला नाही त्याला आणखी वेळ हवा आहे. यामुळे तो दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडलाय. या मालिकेत शमीच्या जागी उमेश यादव संघात खेळणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ टी ट्वेंटी आणि ३ एक दिवसीय मालिका उद्यापासून सुरू होत आहे. टीम इंडियाला २८ सप्टेंबर पासून टी ट्वेंटी मालिका खेळायचे आहे. तर एक दिवसीय मालिका ६ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक

• पहिला टी ट्वेंटी सामना २८ सप्टेंबर
• दुसरा टी ट्वेंटी सामना २ ऑक्टोबर
• तिसरा टी ट्वेंटी सामना ४ ऑक्टोबर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एक दिवसीय मालिकेचे वेळापत्रक

• पहिला एकदिवसीय सामना ६ ऑक्टोबर
• दुसरा एक दिवसीय सामना ९ ऑक्टोबर
• तिसरा एकदिवसीय सामना ११ ऑक्टोबर

इंडिया आणि दक्षिण आफ्रिका मालिका स्टार नेटवर्क प्रसारित केली जाईल. स्टार च्या वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेमध्ये सामना प्रसारित केला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा