छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या हरियाणातील दोन चोरट्यांना फिल्मी स्टाइलमध्ये पकडले आहे. पोलिसांनी केलेल्या शिताफीच्या कारवाईत तब्बल 4.87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या त्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि संशयितांना अटक केली.
मोहम्मद कैफ आणि आझाद खान दोघेही राहणार हरियाणा अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून हातोडी, रॉड, दोरी, लोखंडी साखळी, स्क्रू ड्रायव्हर, मोबाईल, एटीएम कार्डसह रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून,या दरम्यान पसार झालेल्या तिघा साथीदारांचा शोध सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: संजय आहेर
