‘पॅडल फॉर हिस्ट्री’ उपक्रमांतर्गत हर्षवर्धन पाटील यांनी केला इंदापूर ते सरडेवाडी सायकल प्रवास

इंदापूर, १४ फेब्रुवरी २०२१: बारामती स्पोर्ट फाउंडेशन कडून ‘पॅडल फाॅर हिस्ट्री’ या मोहिमेअंतर्गत एकच ध्यास ३५० किल्ले सायकल प्रवास हे अनोखे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ऐतिहासीक किल्ल्यांना सायकल वरुन भेटी देण्यात येणार आहेत.

आज दि.१४ फेब्रुवारी रोजी या अभियानांतर्गत बारामती ते परांडा सायकल रॅली चे आयोजन करण्यात करण्यात येत असून इंदापूरमध्ये ही रॅली दाखल होताच माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या रॅलीचे जंगी स्वागत करून  सरस्वतीनगर बाजूकडील बारामती उड्डाणपूल ते सरडेवाडी येथील हॉटेल स्वामीराज इथेपर्यंत असा पाच किलो मीटरचा सायकल प्रवास केला. युवकांना पर्यावरण, शारीरिक तंदुरुस्ती आणि ऐतिहासिक किल्ल्यासाठीच्या  मोहिमेस पाठिंबा दिला.
यावेळी आय काॅलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इंदापूर सायकल क्बलचे सदस्य सहभागी झाले होते. बारामती स्पोर्ट फाउंडेशन चे प्रमुख आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,  “ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गड किल्ल्यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठी हा उपक्रम स्तुस्त आहे. युवकांसाठी ही मोहीम प्रेरक ठरेल. ग्रामीण भागातील युवकांना खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. पर्यावरणीय जनजागृतीसाठी तसेच कोरोना पार्श्वभूमीवर शारीरिक तंदुरुस्तीसाठी हे उपक्रम प्रेरक आहेत.”

आयर्नमॅन सतिश ननवरे म्हणाले की, ” ग्रामीण भागातील युवक आॅलंपिकमध्ये  सहभागी होऊन ते यशस्वी व्हावेत यासाठी बारामती स्पोर्ट फाउंडेशनकडून पॅडल फाॅर हिस्ट्री या मोहिमेअंतर्गत अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे.” सरडेवाडी येथील हाॅटेल स्वामिराज एक्झक्युटीव्हचे मालक बाळासाहेब पाटील यांनी या सायकल रॅलीतील सहभागी व्यक्तींना चहा व अल्पोपहाराची मोफत सोय करून त्यांना पुढील वाटचालीस व सुखकर प्रवासास शुभेच्छा दिल्या.

यावेळी इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, इंदापूरचे नगरसेवक प्रशांत शिताफ, हर्षल पाटील आदी उपस्थितीत होते. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा