हरियाणा : क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल

8

चंदीगड, १ जानेवारी २०२३ : भारतीय हॉकी संघाचा माजी स्टार खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात चंदीगड पोलिसांनी महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२२ रोजी लेडी कोचने चंदीगड पोलीस मुख्यालयात जाऊन एसएसपींची भेट घेतली आणि तिची तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासासाठी २६ पोलीस स्टेशनला पाठवले. त्यानंतर आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंदीगड येथील सेक्टर २६ पोलीस स्टेशनमध्ये क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात कलम- ३५४, ३५४A, ३५४B, ३४२, ५०६ IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकाच्या आरोपांचे खंडन केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा