हाथरस गँगरेप प्रकरण: बलात्काऱ्यांचा ”विकास दुबे” होणार ? – भाजप नेत्यानं दिले संकेत  

हाथरस (उत्तर प्रदेश), ३० सप्टेंबर २०२०: उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करत तिची हत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणीनं १५ दिवस मृत्यूशी झुंझ दिल्यानंतर आज तिने प्राण सोडले. यानंतर बलात्काऱ्यांना त्वरित शिक्षा देण्याची मागणी होत आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. 

”या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यात आलं असून लवकरच त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मला माहिती आहे की, त्यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते”. असं सूचक वक्तव्य कैलाश विजयवर्गीय यांनी केलंय. त्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलंय. 

गाडी पलटी होणं म्हणजे नेमकं काय?

कैलास विजयवर्गीय यांनी गाडी पलटी होण्याचं जे सूचक वक्तव्य केलं, त्याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेशमधील  गँगस्टर विकास दुबेला अटक केल्यानंतर त्याला कानपूरला नेत असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. या गाडीत दुबे होता. कार उलटल्यानंतर दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळत होता. यावेळी पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. यामध्ये दुबेचा एनकाऊंटर करण्यात आला. त्यामुळे विजयवर्गिय यांच्या विधानावरुन हाथरस प्रकरणात देखील दोषींसोबत असंच घडू शकतं. असं सूचक वक्तव्य करण्यात आलंय. विजयवर्गीय थेट असं बोलले नसले तरी त्याच्या वक्तव्यानुसार विकास दुबे प्रमाणेच या चार नराधमांचं एन्काउंटर घडू शकतं. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा