टेंभुर्णीत काँग्रेसच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध

माढा, दि. २ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित कुटुंबातील मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. त्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे जात असताना त्यांना पोलीसांनी धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध करीत टेंभुर्णी शहर ता. माढा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना निवेदन देण्यात आले.

टेंभुर्णी शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सकाळी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध करीत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे निषेधाचे पत्र देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष सोमनाथ कदम, सोलापूर जिल्हा सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भाऊ वाघ, भीमराव बंडगर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय मोरे, गोरख देशमुख,ओबीसी सेलचे सचिन जाधव, वडार पँथरचे बाबा धोत्रे, मी वडार महाराष्ट्र संघटनेचे सुनिल धोञे, प्रशांत देशमुख, सुनील जगताप, सचिन कांबळे, सनी सोनवणे, रवि सोनवणे, रणजित खंडागळे, आप्पा जाधव, गणेश कांबळे, विकास सुर्वे आदी कार्येकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा