हत्या की आत्महत्या, कलह की विकलह

3

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२१ : प्रयागराजमधील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचे नुकतेच निधन झाले. खरं तर हे निधन नाही, तर त्याचां मृतदेह वाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळाला आणि सुरु झाला शोध. हत्या की आत्महत्या… कलह की विकलह… नरेंद्र गिरी यांचा मृतहेद मिळाला आणि चित्रपटातल्या कथेप्रमाणे यात गूढ निर्माण झाले.

अल्लापूर येथिल वाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले. पण ही नक्की आत्महत्या होती का हत्या याचा तपास सुरु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. तेव्हा खोलीचे सर्व दरवाजे बंद होते.

खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस तपासादरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट तब्बल ७ पानी असल्याचं कळतंय. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा काय दृश्यं समोर दिसलं हे एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. त्यात नरेंद्र गिरी यांचा मृतदेह पंख्याखाली जमिनीवर पडलेला दिसून आला. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी पंखा सुरू होता. यानंतर नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येच्या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र संवेदनशीलतेच्या कारणामुळे तो व्हिडियो माध्यमांना दाखवलेला नाही.

नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमधून अनेक नावे समोर आली आहेत. तर अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. यात महंतांचा शिष्य आनंद गिरी याच्यावर मानसिक छळाचे आरोप करत आपल्या मृत्यूला जबाबदार धरत असल्याचा उल्लेख महंतांकडून करण्यात आला होता. तसेच नोटमध्ये आश्रमाबाबत काय करायचं याबाबतही लिहिलं आहे. तसंच कुणाची काळजी घ्यायची. कुणाला काय द्यायचं आहे, याबाबतही त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय.

आपल्या शिष्यांमुळे दु:खी असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. मात्र या सुसाईड नोटवरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अनेक संतांच्या आणि शिष्यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र गिरी आत्महत्या करणं शक्य नाही. हे एक कटासहीत हत्येचं प्रकरण असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय.

उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका एसआयटीचं समिती नेमली होती. परंतु, आता राज्य सरकारकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलीय. नरेंद्र गिरींच्या सुसाईड नोडमधील इच्छेनुसार त्यांना वाघंबरी मठातच भूसमाधी देण्यात आली. यावेळी अनेक साधू संत उपस्थित होते. तर प्रयागराजमध्ये शाळा दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र अजूनही तपास सुरु असून हत्या की आत्महत्या हे गूढ उघडणे बाकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा