लखनऊ, ९ डिसेंबर २०२०: लखनऊमध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला. नवरा दारूच्या नशेत घरी पोहोचला तेव्हा या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. यानंतर आरोपीनं प्रथम पत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात तो यशस्वी झाला नाही तेव्हा त्यानं आपल्या पत्नीची जीभ कापली.
या वृत्तानुसार, लखनौच्या तहसीलच्या भट्टा गावात रचित राणावत नशेच्या व्यवस्थित घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं आपल्या पत्नी सोबत भांडण सुरु केलं व तिला जबरदस्त मारहाण केली. यादरम्यान त्यानं तिचा गळा देखील दाबला. गळा दाबत असताना पत्नी ची जीप तोंडातून बाहेर आली. यावेळी नशेत असलेल्या पतीनं क्रूरपणा करत पत्नीची बाहेर आलेली जीभ आपल्या दातानं कापली.
तोंडातून रक्तस्त्राव झाल्यानंतरही, क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत असताना आरोपीनं आपल्या पत्नीला (सुमन) मारहाण केली. ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घाईघाईनं पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी सुमनला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जिथं तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रचितला अटक केलीय.
डीसीपी सेंट्रल सोमेन वर्मा यांच्यानुसार आरोपी राणावतनं पत्नीला मारहाण करत आपल्या दातांनी तिची जीभ कापली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील चौकशी सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे