त्याने शोधली फेसबुकची चूक बनला लखपती

पुणे : आजच्या स्मार्टफोनच्या काळात सोशल मीडियावर सर्वच अॅक्टिव्ह होताना दिसत आहेत. फेसबुक हे तर जगभरातील नेटकऱ्यांचे आवडते माध्यम बनले आहे. फेसबुकवर अपडेट्स बघण्यामध्ये लोक दिवसभरातील कित्येक तास घालवत असतात. तशाच या फेसबुकने पुण्यातील एका तरुणाला ४० लाखांचे बक्षीस मिळवून दिले आहे.
या तरुणाने फेसबुकमधील एक गंभीर चूक म्हणजेच शोधून काढली. अमोल बैकर असे या तरुणाचे नाव असून दहा वर्षे जुन्या बगचा शोध या तरुणाने लावला. या कारणामुळे फेसबुकने या तरुणाला ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.
जगभरातील कोट्यावधी लोक या फेसबुकचा वापर करत असतात. सोशल मीडिया साइट्सचा वापर करत असताना त्यामधील त्रुटी शोधणे हा अमोलचा छंद आहे. आता हा छंदच त्याचा व्यवसाय बनला आहे. अनेकवेळा इंटरनेचा वापर करताना काही वेबसाइट्सवर नोंदणी करावी लागते.
यावेळी लॉग-इन करणे अनिवार्य असते. यामध्ये ‘लॉग-इन विथ फेसबुक’ असा ऑप्शनही येतो. याद्वारे लॉग-इन करत असताना यातील देण्यात येणाऱ्या परवानगीचा फ्लो हॅक करणे शक्य असल्याचे अमोलने निदर्शनास आणून दिले. वेबसाइट्स यूजर्सचा डाटा हॅक करु शकतात हे शक्य असल्याचे अमोलने यावेळी दाखवून दिले. त्याने फेसबुकला याविषयी माहिती दिली. यानंतर फेसबुकने तात्काळ त्यामधील त्रुटी दूर करुन ही सुविधा सुरक्षित केल्याचे अमोलला सांगितले.

यानंतर फेसबुकने अमोलला आपल्या बग बाउंटी योजनेमधून ५५ हजार अमेरिकी डॉलरचे म्हणजे ४० लाखांचे बक्षीस दिले आहे. सिक्युरिटी रिसर्चर म्हणून काम करण्यात अमोल याने कम्पुटर इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. अमोल सध्या विविध वेबसाइटसाठी सुरक्षा देखभालीचे काम करत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा