उस्मानाबाद, दि. १८ जुलै २०२०: कोरोना महामारीचे संकट आसताना ही तरुण हा आपल्या प्रियसीला भेटायला महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून थेट पााकिस्तान लाच निघाला होता. प्रेम करण्यार्या युगलांची गोष्ट हि निराळीच आसते. तर ते काय करतील याचा नेम कुणालाही धरता येत नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणाला पाकिस्तानतील तरुणीवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रेम झाले. त्यानंतर त्यांच्या नात्याला एक वेगळा अकार या मध्यमातून भेटत गेला आणि तरुण हा तिला भेटण्यासाठी व्याकूळ झाला. त्यानंतर तो घरातून फोनवर बोलत बाहेर पडला आणि घरच्यांना येतो म्हणून सांगून गेला.
११ तारखे पासून तो बेपत्ता होता. काही दिवसानंतर तो घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याचे सर्व सोशल मिडिया अकांऊट हे खंगाळून पाहीले आणि चौकशी केली आसता, त्याचे हे प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा नंबर स्ट्रेस केला आणि तो गुजरातच्या दिशेने जात असल्याचे लोकेशन भेटले.
पोलिसांनी गुजरात च्या पोलिसांशी संपर्क साधत तरुणाबद्दल माहिती दिली. कच्छ मधील वाळवंटात त्याची बाईक हि पोलिसांना हाती लागली. तर सीमेजवळ त्याला देखील पकडण्यात यश आले. तरुण हा सध्या इंजिनयरिंग च्या दुसर्या वर्षात शिकत आसल्याची माहिती समोर आली आहे.
कोरनाच्या या माहामारीत देशात जिल्हाबंदीच काय तर सध्या राज्य बंदी आहे. एव्हढ्या कठोर पद्धतीचे लाॅकडाऊन आसून ही हा तरुण गुजरात पर्यंत कसा पोहचला याची चौकशी पोलिस करत आहेत. तर उस्मानाबाद हून तरुणाला आणण्यासाठी एक पोलिस पथक हे गुजरातला रवाना झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी