गोल पोस्ट राष्ट्रीय तो गेला पण प्रकरण मात्र थांबेना, सुशांतच्या वकिलाने ठाकरे सरकारवर केली टिका…..

तो गेला पण प्रकरण मात्र थांबेना, सुशांतच्या वकिलाने ठाकरे सरकारवर केली टिका…..

बिहार, २ ऑगस्ट २०२० : सुशांत सिंग राजपूत यांंनी आत्महत्या करुन अनेकांना खुप मोठा धक्का दिला. पण त्याच्या जाण्यानंतर मात्र वाद राजकारण चालूच आहेत.या प्रकरणात आता सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतची प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बिहार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्या नंतर चौकशीला सुरवात करण्यात आली. मात्र नंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सोशल मिडियावर चालूच आहेत. अशातच शनिवारी राजपूत कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे नवा वाद उफळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

“उद्धव ठाकरे यांना कायद्याचे ज्ञान नाही.फौजदारी खटल्यामध्ये खटला दाखल करणाऱ्याला सत्यापर्यंत पोहचवायचं असतं तक्रारदाराला नव्हे. बिहार पोलिसांनी याबाबत खटला दाखल करून घेतला असल्याने प्रकरणाच्या तपासाचे काम बिहार पोलिसांचे आहे उद्धव यांचे नाही.” असं वक्तव्य त्यांनी एएनआय या नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना केला. ज्यामुळे अनेक ठिकाणांहून तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

विकास सिंह यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत तर महाराष्ट्रात मात्र या बद्दल जरा प्रकरण चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. तर या एका होतकरु गुणी कलावंताने जगाचा निरोप घेऊन दिड महिना उलटला पण त्याच्या मृत्यूचे आता राजकारण होताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version