त्याने आपल्या कुत्र्यासाठी बनवली चक्क ‘लिफ्ट’ !

पुणे, २० ऑक्टोबर २०२२ : आजच्या काळात बहुतेकांना पाळीव प्राणी घरात ठेवायला आवडतात. काही जणांना मांजर किंवा कुत्रा पाळणे आवडते. अनेक लोक प्राणी-पक्ष्यांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ रोज पाहायला मिळतात, ज्यामध्ये त्यांच्यातील बॉन्डिंग मनाला आनंदित करते. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मालक आणि त्याचा पाळीव कुत्रा यांच्यातील प्रेम आणि बंध पाहून तुमचे हृदय आनंदी होईल. व्हिडिओमध्ये कुत्र्याच्या पायाची समस्या पाहून मालकाने केले असे काम, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पायऱ्यांच्या बाजूला पडलेला एक कुत्रा बससारख्या लिफ्टमधून खाली येताना दिसत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मालकाने ही लिफ्ट फक्त त्याच्या पाळीव कुत्र्यासाठी बनवली आहे, जेणेकरून त्याला वर-खाली जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या गोंडस कुत्र्याच्या पायात काही समस्या असल्याने त्याला पायऱ्या चढणे उतरणे कठीण आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @buitengebieden नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या कुत्र्याच्या मालकाने संधिवात असलेल्या आपल्या पाळीव कुत्र्यासाठी बस लिफ्ट बनवली आहे.’ त्यांच्या पाळीव कुत्र्याबद्दलची अशी आपुलकी पाहून वापरकर्ते मालकाचे कौतुक करताना थकत नाहीत. या व्हिडिओला आतापर्यंत १.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर २८ हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा