शेतात थोर महात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करून ऊस लागवडीस केली सुरुवात

माढा (सोलापूर), दि. २६ जुलै २०२०: माढा तालुक्यातील शिडशिंगे येथील धनाजी शामराव सरवदे या शेतकऱ्यांनी स्वतःच्या दहा ऐकर जमीनी पैकी दोन एकर शेतात उसाची लागवड सुरू असताना प्रतिमेचे पूजन करून लागवडीस सुरुवात केली.

वास्तविक पाहता शेता मधे नवीन पिकाची पेरणी लागवड करताना गावातील देवांना श्रीफळ व नैवेद्य वाढवून सुरुवात केली जाते. हि परंपरा आजही पहावयास मिळते. परंतु धनाजी शामराव सरवदे या शेतकऱ्यांने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला योग्य मार्गाने जाण्याची शिकवण दिली व त्यांच्या आदर्श विचारांच्या प्रेरणेने आज भारत देशाची जडणघडण झाली व महाराष्ट्राच्या पावन भूमीत त्यांचे थोर कार्य घडले.

त्यांच्या विचारांनी फक्त सुशिक्षित नव्हे तर शेतकरीसुद्धा प्रेरणा घेतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळते धनाजी सरवदे हे रोज स्वतःच्या घरातील या थोर महात्म्याच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन शेतात कामावर जातात. असेही न्यूज अनकटला सांगितले.

या थोर महात्म्याच्या प्रतिमा शेतात नेऊन त्यांची पूजा करून ऊस लागवडीस सुरुवात केली हे खर्या अर्थाने महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची चळवळ रुजण्यास सुरवात झाली. हे म्हणावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा