जिनिव्हा, स्वित्झर्लंड: कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाने जगभर थैमान घातले आहे. या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १ लाख ६६ हजारांहून अधिक आहे. यानंतरही डब्ल्यूएचओ ने एक अजून मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही,” असंही ते बोलले आहेत.
करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर हा इशारा देण्यात आला आहे. अर्थव्यवस्था ढासळत आहे, आता लोक काळजी घेत आहेत, आमच्याकडे कोरोनाचे रुग्ण नाहीत असे म्हणत अनेक ठिकाणी संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
काही देशांनी लॉक डाउन शिथिल करण्यास सुरावट केली आहे. तसे काही देशांनी थोड्या प्रमाणात उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहेत. परंतु अजूनही धोका तळलेला नाही त्यामुळं असे निर्णय महागात पडू शकतात असे डब्ल्यूएचओ सांगितले. अजूनही जगातील काही भागात हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पोहोचलेला नाही त्यामुळे तिथे लागण होण्याचा देखील धोका वर्तवण्यात आला आहे.