नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याला पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाब या ३ राज्यांनी विरोध केला आहे. या राज्यांनी या विधेयकाची अंमलबजावणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकत्व कायद्यावरुन आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरु असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
गुहावटीत हजारो नागरिक संचारबंदीचा भंग करुन रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत.
हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करणारा असून तो लागू केला जाणार नाही, असे पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे. तसेच केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांनीही हा कायदा लागू केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.