जम्मू-काश्मीर, 30 जानेवारी 2022: जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. कुलगाम जिल्ह्यात एका पोलिसाच्या हत्येनंतर पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मोठ्या संख्येनं लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून चकमक सुरू आहे. दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
दुसरीकडं, शनिवारी संध्याकाळीच कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा येथे संशयित दहशतवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी झाडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलाय. सर्वत्र नजर ठेवली जात आहे. यासोबतच दहशतवाद्यांच्या धाडसाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.
सीआरपीएफचं वाहन परिसरात तैनात
याआधी 22 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शोपियानमधील किलबाल येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. यासोबतच दोन दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलांनी घेतलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे