पुरंदर, दि.२९ एप्रिल २०२० : गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी योद्धा म्हणून लढत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी व कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जेजुरी येथे पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी जेजुरी येथील खासगी डॉक्टरांकडून करण्यात आली.
तसेच पोलीस बांधवाना आरोग्य विषयी मार्गदर्शनही करण्यात आले. जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अंकुश माने व डॉ.ओंकार पोटे यांच्या पुढाकारातून पोलीस बांधवांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये डॉ.प्रमोद वाघ, डॉ. संजय गळवे, डॉ. अशोक यादव, डॉ. सतीश कारकर, डॉ. महेंद्र दीक्षित, डॉ ओंकार पोटे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचा रक्तदाब, मधुमेह, ऑक्सीजन स्याचुरेशन, पल्स, थर्मल स्क्रिनिंग मशिनद्वारे थर्मल तपासणी तसेच ओक्सिवॉच मशिनद्वारे तपासणी करून होमिओपॅथी औषधाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कोरोना विषाणूशी लढताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सर्वांचे आभार मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे