बारामती, ११ जानेवारी २०२१: बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन येथे आज रविवार दि.१० रोजी शहरातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मेडिकोज गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते.
सध्या कोरोना काळात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक वेळा चोवीस तास ड्युटी करावी लागत असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी शहरातील काही सामाजिक काम करत असलेल्या ऑल इंडिया पोलीस जनसेवा, दलित पँथर, सत्याचा प्रहार संघटना, अन्याय अत्याचार निर्मूलन, बारामती लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती शहर व तालुका पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त, शुगर ऑक्सिजन, तापमान तपासण्यात आले यासाठी मेडिकोज गिल्ड यांच्या पदाधिकारी व डॉक्टर यांनी मोठे सहकार्य केले.
यावेळी डॉ.संजय पुरंदरे, डॉ तुषार गदादे, डॉ चंद्रकांत पिल्ले, डॉ सुहासिनी सोनवले, डॉ अंजली खाडे, डॉ स्वाती वणवे, डॉ मनीषा शेळके, डॉ सौरभ मुथा, डॉ निरुपा शहा, डॉ सचिन घोरपडे, डॉ अश्विनकुमार वाघमोडे,
डॉ संताजी शेळके, डॉ आनंद वणवे, डॉ आनंद हारके, डॉ प्रमोद आटोळे, डॉ मिनाक्षी देवकाते, डॉ संदेश शहा, डॉ गणेश बोके, डॉ.राम नीचाळ डॉ वैभव सत्रे, यांच्यासह संघटनेचे प्रकाश डोंगळे, भालचंद्र महाडिक, स्मिता दातीर, महेश गायकवाड, लालासो धायगुडे, अमित बगाडे, गौरव अहिवळे, शुभम गायकवाड, वंदना भोसले हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव