श्रीरामपूर, दि.५ मे २०२०: सहकार महर्षी, लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याशिबीराचे उद्घाटन बाजार, समितीचे सभापती दिपक पटारे यांच्याहस्ते व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. बाळासाहेब विखे पाटील, यांच्या जयंतीचे औचित्य साधून जनसेवा मंडळ, श्रीरामपुर व डॉ. विखे पाटील हास्पिटल विळदघाट पंचायत समिती श्रीरामपुर यांच्या सहकार्याने “डॉक्टर आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक अण्णा पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभासपती बाळासाहेब तोरणे, हाजी ईस्माल शेख, शकिल शेख, शफिक आतार, रवींद्र गायकवाड, दस्तगीर शेख, केंद्र प्रमुख उत्तम शेलार, मुख्याध्यापक नंदु कुमार परदेशी, बाळासाहेब शेलार प्रभाकर ताके, सतीश शेलार, राजेंद्र कुताळ, शांतवण अमोलिक, शोएब शेखशा, शुभम नवले, विष्णुपंत डावरे, अरुण आमोलिक उपस्थित होते.
तपासणी पथकात डॉ. सचिन चौधरी, डॉ. सोहम मदनकर, सिस्टर उषा,थोरात बापु बलमे, सुदाम भागवत, प्रदिप लोखंडे आदींचा सहभाग होता. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी: दतात्रय खेमनर