इंदापूर तालुक्यात मच्छिमारांची आरोग्य तपासणी

इंदापूर, दि.५ मे २०२०: सध्या कोर्टाने देशासह राज्यांमध्ये हाहाकार माजविला असताना घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणे तसेच त्यांना आरोग्य विषयक माहिती देणे, यासाठी इंदापूर तालुक्यातील पिंपरी उपकेंद्र येथील वैद्यकीय कर्मचारी यांच्या समवेत डॉ. मिलिंद यादव यांनी पडस्थळ येथे मंगळवारी दि.५ रोजी जाऊन मच्छिमारांची आरोग्य तपासणी केली.

मच्छीमारांची आरोग्य तपासणी डॉक्टर मिलिंद यादव आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केली तसेच त्यांना कोरोना विषयी माहिती देऊन जनजागृती देखील केले. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले जेणेकरून ते आपल्या गावी परत जाऊ शकतील. या तपासणी दरम्यान कोणीही कोरोना संक्रमित नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील डॉक्टर यादव यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा