आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

मुंबई, १९ फेब्रुवरी २०२१: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. आपण बरे आहोत आणि डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत: ची काळजी घ्यावी आणि आपल्याला लक्षणे दिसल्यास त्वरित त्याची चाचणी करून घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले.

टोपे यांनी लिहिले आहे की कोरोनाला पराभूत केल्यानंतर ते लोकांची सेवा करू शकतील. पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत तातडीची बैठक बोलविली आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ५,४०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

या तिन जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात रविवारपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. यवतमाळ, अकोला व अमरावती हे तीन जिल्हे आहेत. यवतमाळात २८ फेब्रुवारीपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यू लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शनिवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळपर्यंत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन आहे.

गुरुवारी मुंबईतही नवीन कोरोना मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून त्याअंतर्गत होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. या व्यतिरिक्त, ज्याला होम क्वारंटाईन केले आहे त्याच्या हातावर शिक्का मारला जाईल.

एकट्या मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ७३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन नियमांनुसार, बीएमसीने ५ हून अधिक प्रकरण सापडलेल्या इमारती सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी होम क्वारेन्टाईनचे नियम मोडले त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नवीन नियमांनुसार, विवाह किंवा सार्वजनिक उत्सवात ५० हून अधिक लोक एकत्र आले तर अश्या स्थितीत देखील कारवाई केली जाणार आहे. मास्कशिवाय जे लोक फिरत आहे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मुंबई लोकलमध्ये ३०० मार्शल नियुक्त केले जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा