लसीकरणानंतर १३० तासांनी आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, लसीवर प्रश्नचिन्ह

गुरुग्राम, २३ जानेवारी २०२१: कोरोना विरुध्द लढण्यासाठी देशात लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, गुरुग्राममध्ये कोरोना लस लावल्यानंतर १३० तासांत एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. गुरुग्राममधील न्यू कॉलनी पोलिस ठाण्यात मृताच्या कुटुंबियांनी कोरोना लसीकरणाची तक्रार केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यूबद्दल गुरुग्रामचे सीएमओ म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला नाही.

कृष्णा कॉलनीची रहिवासी असलेली 55 वर्षीय राजवंती भांगरौला येथील पीएचसी केंद्रात पर्यवेक्षक म्हणून तैनात होती. १६ जानेवारीला राजवंतीला कोरोना ची लस मिळाली. पण १३० तासानंतर तिचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत मृताच्या मुलाने कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

इतकेच नाही तर मृताच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात कोरोना लसीकरणाची तक्रार देखील केली आहे. लसीकरण त्वरित थांबवावे, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूवर गुरुग्रामचे सीएमओ यांचे निवेदन आले आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मृताचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला नाही. सद्यस्थितीत कुटुंब लसबाबत प्रश्न उपस्थित करीत आहे. तथापि, आरोग्य कर्मचार्‍याच्या मृत्यू आणि लसीकरणामध्ये काही संबंध आहे का याचा पुरावा मिळालेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा